¡Sorpréndeme!

मेगास्टार शिवाजीराव गायकवाड म्हणजे रजनीकांत करतोय मराठीत आगमन | Rajinikanth Latest News

2021-09-13 4 Dailymotion

मेगस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट कोणता, तो कधी रिलीज होणार, या चित्रपटात नवीन काय पाहायला मिळणार याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.  याच ‘रजनी वेड्यां’साठी एक गुडन्यूज आहे. रजनीकांत लवकरच एका मराठी चित्रपटात दिसणार आहेत. रजनीकांत यांना आपण हिंदी, कन्नड आणि तेलुगु सिनेमांमध्ये पाहिले आहे. अनेक थलाइवा चाहत्यांना रजनीकांत यांनी मराठी चित्रपटात काम करावे असे वाटत असेल. तर लवकरच ते चाहत्यांची ही इच्छाही पूर्ण करणार आहेत. रजनीकांत आणि अभिनेता मामुटी लवकरच एका मराठी चित्रपटात दिसणार आहेत. 
रजनीकांत यांचा कोणताही चित्रपट म्हणजे डोळ्यांसमोर येते ते बिग बजेट आणि फुल ऑन ॲक्शन. मेगास्टार रजनीकांत यांची मराठीत एंट्री होणार म्हणजे चर्चा तर होणारच. रजनीकांत यांच्या मराठी चित्रपटाचे नाव ‘पसायदान’ असून या चित्रपटाची निर्मिती बाळकृष्ण सुर्वे करत आहेत. तर दिपक भावे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. जानेवारी 2018 पासून या चित्रपटाचे शुटींग सुरू करण्यात येणार आहे.
रजनीकांत यांचा 0.2 हा चित्रपटही बराच चर्चेत आहे. अक्षय कुमार या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे म्युझिक लॉन्चींग ‘दुबई’मध्ये करण्यात आले होते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews